गुंतवणूक तुमची - सुरक्षा आमची. हे ब्रिदवाक्य घेऊन संस्थेचे संस्थापक श्री . विजयकुमार शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सन 2012 साली रीतसर केंद्रीय सहकार विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर 2013 साली लातूरमध्ये पहिली शाखा मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली . संस्थेचे संस्थापक हे अर्थ व बँकिगमधील तज्ञ असून जवळपास 25 वर्ष त्यांनी विविध सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम केलेले आहे . सहकाराची जाण असल्यामुळेच छ राजर्षी शाहू मल्टीस्टेटची स्थापना करून गरजू व होतकरू लोकांसाठी ही एक संजीवनी ठरली आहे . आज जवळपास सर्व संचालक हे बँकिग मधील तज्ञ रिटायर्ड व्यक्ती आहेत त्यामुळेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्र आणि कर्नाटक राज्यात असून संस्थेच्या एकूण सात शाखा कार्यरत आहेत . संस्थेने सुरुवातीपासूनच आधुनिक तंत्रज्ञाना द्वारे ग्राहकांना विनम्रपूर्वक सेवा देत आहे .
2012 साली लावलेले रोपटे आता वटवृक्ष होताना दिसून येत आहे . समाजातील Wo घटकांना सोबत घेऊन आर्थिक बळ देण्याचे काम संस्था करीत असून संस्था ही सामाजिक बांधिलकी जोपासून गरीब व होतकरू लोकांना आर्थिक सहाय्य तसेच आवश्यक वेळी मदत करीत आहे . कोरोना काळात संस्थेच्या कर्मचारी वर्गाने केलेले काम उत्तमप्रकारे होते . तसेच गरीब व होतकरू विधार्थ्याना गणवेश व पाठ्यपुस्तक / वह्याचे वाटप शाखेद्वारे प्रत्येक वर्षी करण्यात आले आहे .
हे सर्व गोष्टी आम्ही करू शकलो ते केवळ सभासदांनी ग्राहकांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळेच व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच होत आहे . धन्यवाद !